Aajtakkhaba:याचिकाकर्त्या सुजीत कुमार;-ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’च्या आगामी भागांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. या याचिकेवर सुनावणी गुरुवारी झाली असता ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्याचवेळी याचिकाकर्त्यांना कोर्टानं खडे बोल सुनावले आहेत. कोर्टानं दिलेल्या निर्णयामुळे सीरिजच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.सुप्रीम कोर्टानं मिर्जापूर ३ च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावली आहे. ही मागणी फेटाळून लावताना याचिकाकर्त्यानं प्री-स्क्रीनिंगची मागणी केली होती. परंतु ती देखील कोर्टानं फेटाळून लावली. सिनेमॅटोग्राफर कायद्यासह अनेक कायदे आहेत. त्याअंतर्गंत ओटीटी ला आणायला पाहिजे का असा प्रश्न कोर्टानं यावेळी उपस्थित केला आहे. याचिकाकर्त्यानं दाखल केलेली याचिका योग्य नसल्याचंही सांगितलं. सरन्यायाधीश ललित यांनी सांगितलं की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती केवळ देशातच नाही तर परदेशातही प्रदर्शित होतात. त्यामुळे या संदर्भात अनेक प्रश्न आहेत, त्यावर विचार करण्याची गरज आहे.
याचिकाकर्त्यानं मिर्जापूर हे नाव वापरण्यावर आणि त्या सीरिजमधील विषयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या सीरिजला जे नाव दिले आहे त्यामुळे मिर्जापूर शहराचा अवमान होत आहे. मिर्जापूर शहराला पौराणिकदृष्ट्या महत्त्व आहे. अनेक वेदांमध्ये त्याचा उल्लेक आहे. अशा पवित्र स्थानी खून, हत्या,हाणामारी दाखवणं चूक आहे.
सुजीत कुमार यांनी ही याचिका मिर्झापूरचं दुसरं पर्व प्रदर्शित झालं तेव्हा म्हणजे ऑक्टोबर २०२० मध्ये दाखल केली होती. आता या सीरिजचं तिसरं पर्व लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Edited by:Sachin Lahudkar