Aajtakkhabar:आजपर्यंत तिने निशिकांत कामत, इम्तियाज अली, प्रकाश झा अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळाला असून यापुढेही अशाच दिग्दर्शकांसह काम करायाला मिळायला हवे असेही तिने सांगितले.
सुरुवातीपासूनच निवडक काम करण्याला प्राधान्य दिलं आहे. ‘लय भारी’ सिनेमातून ख-या अर्थाने ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर ‘ट्रकभर स्वप्नं’ या मराठी सिनेमातही ती वेगळ्याच अंदाजात रसिकांच्या भेटीला आली होती. आदितीला साचेबद्ध पठडीत अडकून राहून काम करायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे नेहमी काही तरही हटके आणि वेगळ्या कामाच्या शोधात ती असते. त्यामुळेच की काय आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. चौकटीबाहेरच्या भूमिकांना तितक्याच ताकदीने न्याय देणारी अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली आहे.
आजपर्यंत तिने निशिकांत कामत, इम्तियाज अली, प्रकाश झा अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळाला असून यापुढेही अशाच दिग्दर्शकांसह काम करायाला मिळायला हवे असेही तिने सांगितले. ‘शी’ या वेबसिरीजमध्येही आदितीच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले आता ‘आश्रम’ या सीरिजमध्ये ती झळकत असून या भूमिकेलाही रसिकांची विशेष पसंती मिळत आहे.
Edited By:Sachin Lahudkar