मनोरंजन

Category: महाराष्ट्र

मिर्झापूर ३ वेबसीरिजला सु्प्रीम कोर्टाचा दिलासा

Aajtakkhaba:याचिकाकर्त्या सुजीत कुमार;-ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’च्या आगामी भागांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. या याचिकेवर सुनावणी गुरुवारी झाली असता ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्याचवेळी याचिकाकर्त्यांना कोर्टानं खडे बोल सुनावले आहेत. कोर्टानं दिलेल्या निर्णयामुळे सीरिजच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.सुप्रीम कोर्टानं मिर्जापूर ३ च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावली आहे. ही मागणी फेटाळून लावताना याचिकाकर्त्यानं प्री-स्क्रीनिंगची मागणी केली होती. परंतु ती देखील कोर्टानं फेटाळून लावली. सिनेमॅटोग्राफर कायद्यासह अनेक कायदे आहेत. त्याअंतर्गंत ओटीटी ला आणायला पाहिजे का असा प्रश्न कोर्टानं यावेळी उपस्थित केला आहे. याचिकाकर्त्यानं दाखल केलेली याचिका योग्य नसल्याचंही सांगितलं. सरन्यायाधीश ललित यांनी सांगितलं की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती केवळ देशातच नाही तर परदेशातही प्रदर्शित होतात. त्यामुळे या संदर्भात अनेक प्रश्न आहेत, त्यावर विचार करण्याची गरज आहे.

याचिकाकर्त्यानं मिर्जापूर हे नाव वापरण्यावर आणि त्या सीरिजमधील विषयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या सीरिजला जे नाव दिले आहे त्यामुळे मिर्जापूर शहराचा अवमान होत आहे. मिर्जापूर शहराला पौराणिकदृष्ट्या महत्त्व आहे. अनेक वेदांमध्ये त्याचा उल्लेक आहे. अशा पवित्र स्थानी खून, हत्या,हाणामारी दाखवणं चूक आहे.

सुजीत कुमार यांनी ही याचिका मिर्झापूरचं दुसरं पर्व प्रदर्शित झालं तेव्हा म्हणजे ऑक्टोबर २०२० मध्ये दाखल केली होती. आता या सीरिजचं तिसरं पर्व लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Edited by:Sachin Lahudkar

ठाकरे गटाच्या मशाली’ला शिंदे गट ‘ढाल-तलवारी’ने देणार उत्तर- निवडणूक आयोग

Aajtakkhabar:अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आलं आहे. काल(सोमवार) निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्ह रद्द करत आज(मंगळवार) नवीन चिन्ह पाठवण्यास सांगितले होते.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक चिन्हांसंदर्भात दोन स्वतंत्र ई-मेल निवडणूक आयोगाला पाठवले होते. दोन्ही ई-मेलमध्ये प्रत्येक तीन नवीन चिन्हांचा पर्याय सूचवल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये ढाल-तलवार, तळपता सूर्य आणि पिंपळाचं झाड, रिक्षा, शंख आणि तुतारी असे पर्याय देण्यात आले होते.

संबंधित चिन्हांचा अर्थ सांगताना भरत गोगावले म्हणाले होते की, जनतेचं रक्षण करण्यासाठी ढाल आहे, तर शत्रू अंगावर आला तर त्यांच्यासाठी तलवार आहे. ‘सूर्य’ उगवल्याशिवाय आपला दिवस चांगला जाऊ शकत नाही, त्यासाठी ‘तळपता सूर्य’ हे चिन्ह सादर केलं आहे. तर ‘पिंपळ’ हे पवित्र झाड आहे. त्यामुळे आम्हाला काळजी करायचं काहीही कारण नाही. आम्हाला जे चिन्ह मिळेल ते घ्यायला आम्ही तयार आहोत.

Election Commission of India allots the ‘Two Swords & Shield symbol’ to Eknath Shinde faction of Shiv Sena; they were allotted the name ‘Balasahebanchi ShivSena’ yesterday.

Image

·Twitter Web App

Edited By:Sachin Lahudkar

नाशिक :  अपघातानंतर खासगी बसने अचानक पेट घेतल्यानंतर मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये तब्बल ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर ३८ जण जखमी असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Aajtakkhabar:औरंगाबादमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. मिरची चौकात खासगी बसचा अपघात झाल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. या भीषण अपघाताने तब्बल ११ जणांचा जीव घेतला तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. या अपघाताचे काही फोटो आमच्या हाती आले आहेत. आग इतकी भयंकर होती की यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. तर या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.महापौर घटनास्थळी आहेत. जिल्हाधिकारांशी बोललो. या अपघाताची चौकशी केली जाईल तर सध्या जखमींना मदत करण्यास प्राधान्य दिले आहे. सर्व उपचार शासनाच्या वतीने केला जाईल तर मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये देण्यात येईल’ अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी केली आहे.

Edited By:Sachin Lahudkar

नटसम्राट हा सांस्कृतिक ठेवा!

Aajtakkhabar: नटसम्राट हे अजरामर नाटक सांस्कृतिक ठेवा असून, आजच्या सुवर्ण महोत्सवी दिवशीदेखील त्याचे गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आहे. या नाटकाला मिळणारा प्रतिसाद हे रंगभूमी जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी व्यक्त केले.

ठेवा असून, आजच्या सुवर्ण महोत्सवी दिवशीदेखील त्याचे गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आहे. या नाटकाला मिळणारा प्रतिसाद हे रंगभूमी जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी व्यक्त केले.ठेवा असून, आजच्या सुवर्ण महोत्सवी दिवशीदेखील त्याचे गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आहे. या नाटकाला मिळणारा प्रतिसाद हे रंगभूमी जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी व्यक्त केले.

Edited By:Sachin Lahudkar

28 लक्ष रूपया सह एसबीआय बँकेचे एटीएम पळविले

Aajtakkhabar:जालना- येथील औद्योगिक वसाहत परिसरातील एका बँकेचे ए टी एम मशीन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मध्यरात्री दोन च्यासुमारास घडली आहे.
एका पांढऱ्या स्कॉर्पिओ जीपमध्ये टाकून हे मशीन चोरट्यांनी लंपास केले आहे.

जालना येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी शाखेलगत याच बँकेचे डायबोल्ड कंपनीचे एटीएम मशीन आहे. आज भल्या पहाटे चोरट्यांनी 1. 14 ते 2.00 वाजेच्या सुमारास हे एटीएम मशीन लंपास केले आहे.

त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे एटीएम मशीन एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पियोमध्ये टाकून नेताना चोरटे दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सलग दोन दिवस बँकेला सुट्टी असल्यामुळे मोठी रक्कम या एटीएममध्ये ठेवण्यात आली होती. या एटीएममध्ये रोख 28 लाख 67 हजार 600 रुपये होते._ या रक्कमेसह 4 लाखाचे मशीन असा 32 लाख 67 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

बँकेचे शाखा अधिकारी संतोष अय्यर यांनी तक्रार दिली असून, चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धाडशी घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

Edited By:Sachin Lahudkar