Aajtakkhabar:यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम दुबई, अबुधाबी आणि शारजाहला होणार आहे. 19 सप्टेंबरला पहिला सामना होणार असून 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 डबल हेडर्स सामने असणार आहे.
आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी जवळजवळ सर्वच संघाचे खेळाडू दुबईला पोहचले आहे. युएइमध्ये क्वारंटाइन राहिल्यानंतर, टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूंना सरावासाठी बाहेर पडण्याची परवानगी असेल. दरम्यान, अद्याप आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही आहे.
लवकरच आयपीएल 2020च्या लीग स्टेज सामन्यांचे वेळापत्रक होईल. मात्र त्याआधीच मुंबई इंडियन्स संघानं आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा गतविजेता आयपीएल संघ, मुंबई इंडियन्स सातव्यांदा आयपीएलचा उद्घाटन सामना खेळण्याची शक्यता आहे.
Edited By:Sachin Lahudkar