डोळ्यांच्या साथीनं चिंता वाढवली

डोळ्यांच्या साथीनं चिंता वाढवली

By Aajtakkhabar Admin 12 August 2023

Aajtakkhabar: डोळ्यांचा संसर्ग होणे, या कंजंक्टिवायटिस (Conjunctivitis) आणि डोळे येणे किंवा पिंक आय असंही म्हणतात.

डोळ्याच्या संसर्गामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होते. कंजंक्टिवा हा डोळ्यातील एक  थर आहे जो डोळ्याचा पांढरा भाग आणि पापण्यांच्या आतमध्ये असतो, याला संसर्ग झाल्यास डोळे लाल होतात आणि जळजळ होते, यालाच आपण डोळे येणे किंवा आय फ्लू असं म्हणतो. 

राज्यात डोळ्यांचा संसर्ग (Conjunctivitis) दिवसेंदिवस वाढत चालला आहे.या आजाराच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.गुरुवारी, 10 ऑगस्टपर्यंत 3 लाख 90 हजार 338 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुलढाण्यात 44 हजार 398 रुग्ण आढळले आहेत.आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जात सर्व्हेक्षण सुरू आहेत.हात धुणे, व्यक्तिगत स्वच्छता ठेवणे आणि डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार योग्य उपचार घेण्याचं आवाहनआरोग्य विभागाने केले आहे. 

डोळे येणे हा संसर्गजन्य आजार आहे. जास्तीत जास्त चार दिवस हा आजार राहतो.त्यामुळे आकडेवारी जरी मोठी दिसत असली तरी यातील मोठी संख्या आहे जे ह्या आजारातून बरे झाले आहेत, अशी माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे. 

डोळे येण्याची लक्षणे-

1. डोळे लाल होणे.
2. वारंवार पाणी गळणे.
3. डोळयाना सूज येणे.
4. काही वेळा डोळ्यातून चिकट द्रवपदार्थ बाहेरील बाजूस येतो.
5. डोळ्याला खाज येते.
6. डोळे जड वाटतात आणि डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटते.

डोळे आल्यास अशी काळजी घ्या

1. डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे.
2. इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने डोळे पुसू नये.
3. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये.
4. घराबाहेर जाताना गॉगल वापरा.
5. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा.
6. आपल्या सभोवतालाचा परीसर स्वच्छ ठेवावा.
7. शाळा, वसतीगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे.
8. डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने संसर्ग होतो, त्यामुळे नियमीत हात धुवावा.
9. डॉक्टाराच्या सल्यानुसारच औषधं डोळ्यात टाकावी.

डोळ्यांची साथ परसली आहे, अशा वेळी लहान मुलांची काळजी कशी घ्यावी. 

  • मुलांचा गणवेश स्वच्छ असावा.
  • मुलांना वारंवार डोळ्यांचा स्पर्श करण्यास मनाई करा.
  • मुलांना वारंवार हात धुण्यास सांगा.
  • ते शक्या नसेल तर, मुलांच्या बॅगेत सॅनिटायझर ठेवा आणि ते वापरायला सांगा.
  • शाळेतून आल्यावर मुलांचे हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा.
  • स्वच्छ हाताने डोळे पाण्याने धुवा.
  • संक्रमित व्यक्ती आणि पाळीव प्राण्यांपासून मुलांना दूर ठेवा.
  • मुलांना योग्य प्रमाणात पाणी पिण्यास सांगा.

डोळे आल्यानंतर रुग्णांनी जवळच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालय येथे संपर्क साधून उपचार घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By: sachin lahudkar

One thought on “डोळ्यांच्या साथीनं चिंता वाढवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

घसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो? जाणून घ्या ‘या’ व्हायरल मेसेज मागचं सत्य

Aajtakkhabar:अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल मेसेज मोठ्या प्रमाणावर फिरत असतात. गेल्या  सहा महिन्यांपासून कोरोना व्हायरसबाबत अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर घश्यातील वेदना किंवा कोरडा पडल्यानं कोरोना संसर्गाचा धोका वाढतो अशी पोस्ट व्हायरल होत आहे. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेली घशाच्या कोरडेपणामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो अशी ही पोस्ट होती. आज आम्ही तुम्हाला या पोस्टमागचं सत्य सांगणार आहोत. 

अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल मेसेज मोठ्या प्रमाणावर फिरत असतात. गेल्या  सहा महिन्यांपासून कोरोना व्हायरसबाबत अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर घश्यातील वेदना किंवा कोरडा पडल्यानं कोरोना संसर्गाचा धोका वाढतो अशी पोस्ट व्हायरल होत आहे. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेली घशाच्या कोरडेपणामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो अशी ही पोस्ट होती. आज आम्ही तुम्हाला या पोस्टमागचं सत्य सांगणार आहोत. 

Edited By:Sachin Lahudkar

हृदयासाठी अतिशय घातक आहेत रोज खाल्ले जाणारे ‘हे’ दोन पदार्थ, जीवालाही होऊ शकतो धोका…

Aajtakkhabar:जेव्हाही आपण ब्लड प्रेशर किंवा हृदयासंबंधी आजारांचा विचार करतो तेव्हा सर्वातआधी विचार मिठाचा येतो. त्यामुळे अनेकजण कमी मीठ असलेली डाएट घेतात.

जेव्हाही आपण ब्लड प्रेशर किंवा हृदयासंबंधी आजारांचा विचार करतो तेव्हा सर्वातआधी विचार मिठाचा येतो. त्यामुळे अनेकजण कमी मीठ असलेली डाएट घेतात. पण हा विचार करणं चुकीचं ठरेल की, सोडिअम कमी केल्याने हृदयाला धोका होत नाही.जेव्हाही आपण ब्लड प्रेशर किंवा हृदयासंबंधी आजारांचा विचार करतो तेव्हा सर्वातआधी विचार मिठाचा येतो. त्यामुळे अनेकजण कमी मीठ असलेली डाएट घेतात. पण हा विचार करणं चुकीचं ठरेल की, सोडिअम कमी केल्याने हृदयाला धोका होत नाही.

Edited By:Sachin Lahudkar

कमकुवत हाडांसह किडनी स्टोनचाही वाढू शकतो धोका; वेळीच जाणून घ्या डायटींगचे हे साईड इफेक्ट्स

Aajtakkhabar; फॅट, कार्ब्स कमी करण्यासाठी कोणतंही खास डाएट करत असाल तर तुम्हाला डायटींग केल्यामुळे शरीराला कोणत्या प्रकारच्या नुकसानांचा सामना करावा लागतो याबबत  माहिती असणं गरजेचं आहे. 

वजन कमी करण्यासाठी तासनतास उपाशी राहणं हे शरीरासाठी योग्य ठरत नाही. आपले कॅलरीज काऊंट कमी करण्याचा हा सगळ्यात चुकीचा मार्ग आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार यातून शरीराला पोषक तत्व मिळण्यास समस्या निर्माण होतात. याचे वेगवेगळे साईड इफेक्ट्स सुद्धा आहेत तुम्ही किटजेनिक डाएट, इंटरमिटेंट फास्टिंग किंवा फॅट, कार्ब्स कमी करण्यासाठी कोणतंही खास डाएट करत असाल तर तुम्हाला डायटींग केल्यामुळे शरीराला कोणत्या प्रकारच्या नुकसानांचा सामना करावा लागतो याबबत  माहिती असणं गरजेचं आहे. 

Edited By:Sachin Lahudkar

तुम्हीसुद्धा चहासोबत हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा; कधी आजारी पडाल कळणारही नाही

Aajtakkhabar:खाण्यापिण्यातून अनेक पोषक तत्व मिळत असतात. ज्यांची आपल्याला रोजच्या आहारात आवश्यकता असते. काही खाद्य पदार्थांमध्ये गैर पोषक तत्व असतात.  त्यामुळे विटामिन्स आणि मिनरल्सना एब्जॉर्ब करण्यास अडथळा येऊ शकतो. व्हिटामीन्स आणि मिनरल्स योग्य प्रमाणात एब्जॉर्ब करण्यासाठी आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार ज्याचे सेवन चहासोबत केल्यानं शरीराला नुकसान पोहोचू शकतं. जेणेकरून तुम्ही तुमच्या चुकीच्या सवयी बदलून

खाण्यापिण्यातून अनेक पोषक तत्व मिळत असतात. ज्यांची आपल्याला रोजच्या आहारात आवश्यकता असते. काही खाद्य पदार्थांमध्ये गैर पोषक तत्व असतात.  त्यामुळे विटामिन्स आणि मिनरल्सना एब्जॉर्ब करण्यास अडथळा येऊ शकतो. व्हिटामीन्स आणि मिनरल्स योग्य प्रमाणात एब्जॉर्ब करण्यासाठी आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार ज्याचे सेवन चहासोबत केल्यानं शरीराला नुकसान पोहोचू शकतं. जेणेकरून तुम्ही तुमच्या चुकीच्या सवयी बदलून

Edited By:Sachin Lahudkar