डोळ्यांच्या साथीनं चिंता वाढवली
Aajtakkhabar: डोळ्यांचा संसर्ग होणे, या कंजंक्टिवायटिस (Conjunctivitis) आणि डोळे येणे किंवा पिंक आय असंही म्हणतात.
डोळ्याच्या संसर्गामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होते. कंजंक्टिवा हा डोळ्यातील एक थर आहे जो डोळ्याचा पांढरा भाग आणि पापण्यांच्या आतमध्ये असतो, याला संसर्ग झाल्यास डोळे लाल होतात आणि जळजळ होते, यालाच आपण डोळे येणे किंवा आय फ्लू असं म्हणतो.
राज्यात डोळ्यांचा संसर्ग (Conjunctivitis) दिवसेंदिवस वाढत चालला आहे.या आजाराच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.गुरुवारी, 10 ऑगस्टपर्यंत 3 लाख 90 हजार 338 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुलढाण्यात 44 हजार 398 रुग्ण आढळले आहेत.आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जात सर्व्हेक्षण सुरू आहेत.हात धुणे, व्यक्तिगत स्वच्छता ठेवणे आणि डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार योग्य उपचार घेण्याचं आवाहनआरोग्य विभागाने केले आहे.
डोळे येणे हा संसर्गजन्य आजार आहे. जास्तीत जास्त चार दिवस हा आजार राहतो.त्यामुळे आकडेवारी जरी मोठी दिसत असली तरी यातील मोठी संख्या आहे जे ह्या आजारातून बरे झाले आहेत, अशी माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.
डोळे येण्याची लक्षणे-
1. डोळे लाल होणे.
2. वारंवार पाणी गळणे.
3. डोळयाना सूज येणे.
4. काही वेळा डोळ्यातून चिकट द्रवपदार्थ बाहेरील बाजूस येतो.
5. डोळ्याला खाज येते.
6. डोळे जड वाटतात आणि डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटते.
डोळे आल्यास अशी काळजी घ्या
1. डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे.
2. इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने डोळे पुसू नये.
3. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये.
4. घराबाहेर जाताना गॉगल वापरा.
5. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा.
6. आपल्या सभोवतालाचा परीसर स्वच्छ ठेवावा.
7. शाळा, वसतीगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे.
8. डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने संसर्ग होतो, त्यामुळे नियमीत हात धुवावा.
9. डॉक्टाराच्या सल्यानुसारच औषधं डोळ्यात टाकावी.
डोळ्यांची साथ परसली आहे, अशा वेळी लहान मुलांची काळजी कशी घ्यावी.
- मुलांचा गणवेश स्वच्छ असावा.
- मुलांना वारंवार डोळ्यांचा स्पर्श करण्यास मनाई करा.
- मुलांना वारंवार हात धुण्यास सांगा.
- ते शक्या नसेल तर, मुलांच्या बॅगेत सॅनिटायझर ठेवा आणि ते वापरायला सांगा.
- शाळेतून आल्यावर मुलांचे हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा.
- स्वच्छ हाताने डोळे पाण्याने धुवा.
- संक्रमित व्यक्ती आणि पाळीव प्राण्यांपासून मुलांना दूर ठेवा.
- मुलांना योग्य प्रमाणात पाणी पिण्यास सांगा.
डोळे आल्यानंतर रुग्णांनी जवळच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालय येथे संपर्क साधून उपचार घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By: sachin lahudkar
bseymwvLCG