नाशिक : अपघातानंतर खासगी बसने अचानक पेट घेतल्यानंतर मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये तब्बल ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर ३८ जण जखमी असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
By Aajtakkhabar Admin 8 October 2022
Aajtakkhabar:औरंगाबादमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. मिरची चौकात खासगी बसचा अपघात झाल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. या भीषण अपघाताने तब्बल ११ जणांचा जीव घेतला तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. या अपघाताचे काही फोटो आमच्या हाती आले आहेत. आग इतकी भयंकर होती की यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. तर या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.महापौर घटनास्थळी आहेत. जिल्हाधिकारांशी बोललो. या अपघाताची चौकशी केली जाईल तर सध्या जखमींना मदत करण्यास प्राधान्य दिले आहे. सर्व उपचार शासनाच्या वतीने केला जाईल तर मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये देण्यात येईल’ अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी केली आहे.